• दारिद्र्य हि एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्ती किंवा समुदायाकडे किमान जीवनमानासाठी आर्थिक संसाधने आणि आवश्यक गोष्टींचा अभाव असतो. दारिद्र्य म्हणजे रोजगारातून उत्पन्नाची प्राप्ती इतकी कमी असते की, व्यक्तीला आपल्या मूलभूत मानवी गरजा पूर्ण करता येत नाहीत. दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेबद्दल बोलले होते. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, “गरीबी हे मानवी कल्याणापासूनची वंचितता असते. त्यात कमी उत्पन्न आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक मूलभूत वस्तू आणि सेवा घेण्यास असमर्थता समाविष्ट आहे. गरीबीमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचे निम्न स्तर, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता अभाव, कमकुवत शारीरिक सुरक्षा, आणि अपर्याप्त क्षमता यांचा समावेश आहे.” भारतात सण 2011 मध्ये 21.9% लोकसंख्या राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य रेषेखाली जगते आहे. 2018 मध्ये, जगातील जवळजवळ 8% कामगार आणि त्यांचे कुटुंब दररोज 1.90 डॉलर प्रति व्यक्ती (आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषे) पेक्षा कमी उत्पन्न कमावतात.