-
Dr. Rakshit Madan Bagde deposited डिजिटल चलने आणि पैशाचे भविष्य on Humanities Commons 2 years, 7 months ago
अलीकडे डिजिटल चलनामध्ये पैशाबद्दल समाजाचा विचार पूर्णपणे बदलण्याची क्षमता आणि प्रवृत्ती दिसून येत आहे. Bitcoin (BTC), Ethereum (ETH) आणि इतर हजारो क्रिप्टोकरन्सींचा उदय झालेला आज आपणास दिसून येतो. हि चलने केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आज अस्तित्वात आहेत, त्यामुळे आजच्या घडीला जागतिक मध्यवर्ती बँकांना राष्ट्रीय डिजिटल चलन कसे कार्य करू शकतात यावर संशोधन करण्यास प्रवृत्त केले आहे. डिजिटल चलन हे असे चलन आहे जे केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहे. चलनाच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्त्या आधीपासूनच बहुतेक देशांच्या वित्तीय प्रणालींवर वर्चस्व गाजवत आहेत. आधीच बँक खात्यांमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक चलनापेक्षा डिजिटल चलनामधील अंतर म्हणजे डिजिटल चलनाला कधीही भौतिक स्वरूप धारण करता येत नाही. जून 2019 मध्ये फेसबुकच्या नेतृत्वाखालील त्यांचे डिजिटल चलन लिब्राची योजना जाहीर करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात जगाचे लक्ष याकडे वेधले गेले. या अध्ययनातून डिजिट चलन हे पारंपरिक चलनाला प्रभावित करणार काय, डिजिटल चलनाचे फायदे आणि भविष्यात या चलनाला मान्यता मिळेल काय या बाबद चर्चा करण्यात येणार आहे.