-
Dr. Rakshit Madan Bagde deposited भारतातील दुग्धव्यवसाय : विकास आणि आव्हानाचे मूल्यांकन on Humanities Commons 2 years, 7 months ago
भारतीय समाजात खाद्यपदार्थ, धर्म, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेसह अनेक पैलूंमध्ये दुग्धव्यवसाय एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे. भारतामध्ये 300 दशलक्ष पेक्षा जास्त गोवंशासह जगातील सर्वात मोठा दुग्ध जनावरे असलेला देश आहे. दुधाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत सर्व जगामध्ये प्रथम आहे. उत्पादित बहुतेक दुधाचा वापर देशांतर्गत केला जातो. 20 व्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धापर्यंत ऑपरेशन फ्लडने भारतीय डेअरी उद्योगाला जगातील सर्वात मोठ्या उद्योगात रूपांतरित केले आहे. पूर्वी भारतात दूध उत्पादन मुख्यत्वे घरगुती स्तरावर केले जायचे. आज घडीला भारतातील डेअरी उद्योगाचा आर्थिक विकासावर मोठा परिणाम झालेला आपणास दिसून येतो आहे. देशात बहुतेक दूध म्हशीपासून येते, गायीचे दूध दुसरे आणि शेळीचे दूध तिसऱ्या क्रमांकावर येते. संबंधित अध्ययनाच्या माध्यमातून भारतातील दुग्धव्यवसाय आणि त्याची प्रगती असेच त्यांच्यापुढील आव्हाने याचे अध्ययन करण्यात येणार आहे. सरकारी प्रयत्नाचा आढावा या माध्यमातून मुख्यत्वे घेतला जाणार आहे.