• भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात एक प्रकारची डिजिटल क्रांती झालेली आपणास दिसून येते आहे. भारतीय नागरिक डिजिटल पेमेंट पद्धतींबद्दल अधिक जागरूक झाले आहेत ज्यामुळे जीवनमानात सुधारणा होत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारत डिजिटल चलन जारी करण्यास सुरुवात करेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. 2 ऑगस्ट 2021 रोजी, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी e-RUPI डिजिटल प्लॅटफॉर्म नावाचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS), नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी (NHA), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) आणि भागीदार बँकांच्या सहकार्याने हे अभिनव डिजिटल सोल्यूशन लॉन्च केले आहे ज्याला ‘ई- RUPI’ असे नाव देण्यात आले आहे. या पेपर च्या माध्यमातून ई रुपया काय आहे, त्याची कार्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे.