• Dr. Rakshit Madan Bagde deposited ई-लर्निंग एक अध्ययन on Humanities Commons 3 years, 3 months ago

    ई-लर्निंगमध्ये अध्यापन हे वर्गात किंवा बाहेर, संगणक आणि इंटरनेटचा वापर यावर आधारित असू शकते. ई-लर्निंग व्याख्या म्हणजे- इंटरनेट, ऑडिओ, व्हिडिओ इत्यादी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विद्यार्थी/कर्मचार्‍यांना प्रशिक्षण आणि विकास प्रदान करणे. वेब-आधारित शिक्षण म्हणजे ई-लर्निंग ज्याला सामान्यतः इलेक्ट्रॉनिक लर्निंग किंवा व्हर्च्युअल लर्निंग म्हणतात. आज लोक पुस्तके शोधण्यापेक्षा किंवा कोणालातरी विचारण्यापेक्षा इंटरनेटवर प्रथम त्या प्रश्नांचा शोध घेतात. त्यामुळे शिक्षणात ई-लर्निंगचे महत्त्व वाढले आहे. विविध विषयांवर परस्परसवादी वर्ग आणि अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम पूर्णपणे नेटवर दिली जातात. ईमेल, लाइव्ह लेक्चर्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही काही माध्यमे आहेत जी सहभागींना विशिष्ट विषयावर त्यांचे विचार मांडण्यास आणि नंतर त्यांच्याशी चर्चा करण्यास सक्षम करतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा लाइव्ह चॅटच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सर्व सहभागींच्या फायद्यासाठी मुद्रित अभ्यासक्रम साहित्यासारखी स्थिर पृष्ठे देखील उपलब्ध करून दिली जातात.